Crime Editor Choice Hingoli dist

हट्टा येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी,एकाचा मृत्यू,दोन गंभीर जखमी

मुख्य संपादक | वसमत प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील हट्टा येथे दि.३१ मे रोजी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.तसेच इतर पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हट्टा गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली असून,हाणामारीचे नेमके कारण आणि घटनेची सविस्तर माहिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement