Editor Choice Education Vasmat city

वसमत येथील श्री सरस्वती निकेतन हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार

तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दि.२ जून रोजी वसमत येथील नामांकित श्री सरस्वती निकेतन हायस्कुलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला,तसेच त्यांच्या यशामागील पालकांच्या योगदानाची दखल घेत त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.विवेक पोतेवार,मुख्याध्यापक श्री. शाम मग्गीरवार सर,पर्यवेक्षक श्री.ठोके सर तसेच जे.आर.डी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका श्रीमती स्मितल दांडेगावकर आणि प्राध्यापक अंकिता कमळू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध करिअर संधी,आधुनिक शिक्षण पद्धती आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
श्रीमती स्मितल दांडेगावकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स,सायबर सुरक्षा,संगणक अभियांत्रिकी आणि रोबोटिक्स यांसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार योग्य क्षेत्राची निवड करून सातत्याने कौशल्यविकास करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा.अंकिता कमळू व प्राचार्य अरुण सातपुते यांनी उच्च शिक्षणासाठी उपलब्ध विविध अभ्यासक्रम,प्रवेश प्रक्रिया तसेच उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्यांविषयी माहिती दिली.तांत्रिक शिक्षणासोबतच संवाद कौशल्य,नेतृत्वगुण आणि नवोपक्रमशील विचारसरणी विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचे योगदान दिल्याबद्दल पालकांचाही सत्कार करण्यात आला.विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळा प्रशासनाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन यापुढेही करण्यात येईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement