Editor Choice Good working Maharashtra

वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक “शहाजी उमाप” यांचा गौरव

वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक”शहाजी उमाप” यांचा गौरव

 

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक:गिरीष देशमुख 

 

दि.२६ जुन रोजी वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान,वसमत जि.हिंगोली यांच्या वतीने नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा पोलीस सेवेतील उल्लेखनीय,उत्कृष्ट व जनहितकारी कार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

पोलीस दलातील प्रदीर्घ सेवाकाळात श्री.उमाप यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे,गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे,सामाजिक सलोखा जपणे तसेच नागरिकाभिमुख पोलीस प्रशासन राबविण्यात मोलाचे योगदान दिले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड पोलीस परिक्षेत्रात विविध जनहिताचे उपक्रम तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्रभावी जनसंवाद कार्यक्रम राबविण्यात आले.त्यामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.उमाप यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक करत,त्यांच्या कार्यामुळे पोलीस प्रशासनाला नवी दिशा मिळाल्याचे सांगितले.समाजात शांतता,सुरक्षा आणि कायद्याचे राज्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सन्मान स्वीकारताना विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हा पुरस्कार संपुर्ण पोलीस दलाचा असल्याची भावना व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळेच पोलीस प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते,असे सांगत त्यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत चेपुरवार,उपाध्यक्ष आदित्य देशपांडे,मनोज चव्हाण,प्रकाश इंगळे, लक्ष्मीकांत जोशी धानोरकर,सचिव आनंद बडवणे,सहसचिव रविकिरण कापुसकरी,कोषाध्यक्ष सुनील कबाडे,सदस्य प्रा.पंजाब अंभोरे,सिताराम म्यानेवार,जयश्री पाटील,साक्षी जोशी आणि गीतांजली भोंग यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.तसेच कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी,पत्रकार केशव घोणसे पाटील व सिव्हिल इंजिनिअर कार्तिक मठपती यांनीही उपस्थिती लावली.

या सन्मानपत्राचे शब्दांकन सुनील कबाडे,सुलेखन आनंद बडवणे आणि वाचन प्रकाश इंगळे यांनी केले.पोलीस सेवेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेत वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानने दिलेल्या या सन्मानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

 

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement