शक्तिपीठ महामार्गाला शिवसेना पक्षाच्या वतीने विरोध करा- संघर्ष समिती.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक: गिरीष देशमुख
प्रस्तावित नागपुर–गोवा शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेने अधिकृतपणे विरोध करावा,अशी मागणी शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.दि.२७ जुन रोजी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिंगोली दौऱ्यादरम्यान समितीने त्यांना निवेदन सादर केले.
हिंगोली जिल्ह्यातुन तसेच वसमत तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होणार असल्याने शेतकरी या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत.या पार्श्वभुमीवर हिंगोली येथे झालेल्या मेळाव्यात संघर्ष समितीने उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन शिवसेनेने शक्तिपीठ महामार्गाविरोधात ठाम भूमिका घ्यावी,अशी विनंती केली.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविला.तसेच शक्तिपीठग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील,असा विश्वास त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
यावेळी हिंगोली जिल्ह्यातील शेकडो शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात संदिप माटेगांवकर,तानाजी भोसले, नवनाथ पाटील कुऱ्हे,माणिक सावंत, सीताराम जाधव,माऊली झटे, विश्वनाथ सावंत,गोरख चव्हाण आदींचा समावेश होता.
निवेदनानंतर “शेतकरी एकजुटीचा विजय असो”, “एकच जिद्द – शक्तिपीठ रद्द” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.














Add Comment