दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ सेनगाव कडकडीत बंद
वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
दिशा न्युज मराठी २४×७,वसमत
मुख्य संपादक गिरीष देशमुख
सेनगाव प्रतिनिधी/ विश्वनाथ देशमुख
दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी शांततापुर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थी,विद्यार्थीनींवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि अश्रुधाराच्या माऱ्याच्या निषेधार्थ दि.२३ जुलै रोजी सकाळ पासुनच सेनगाव तालुक्यात विविध ठिकाणी व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय माजी खा.बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ च्या आवाहनाला सेनगावमधील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
दिल्लीत आपल्या हक्कांसाठी मागणी करणाऱ्या निष्पाप आंदोलक मुला-मुलींना पोलीसांनी अमानुष बळाचा वापर केला होता.या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.प्रशासनाच्या या दडपशाही आणि हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात संपुर्ण देशातुन संताप व्यक्त होत आहे.याच सरकारी दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी संपुर्ण ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले होते.याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कपिल वाकळे आणि भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय दिलीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडाळाने सेनगावचे तहसिलदार तसेच पोलीस प्रशासनाला याबाबतचे रितसर निवेदन सादर केले.लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि जखमी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे रा होण्यासाठी सेनगाव मधील व्यापारी बांधवांना आपपली दुकाने बंद ठेवुन या लढ्यात सक्रीय सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते.दि.२३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या या आवाहनाला सेनगाव शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागात आणि प्रमुख गावामध्ये व्यापारी वर्गाने ऐतिहासिक साथ दिली.सकाळी नेहमी प्रमाणे उघडणारी बाजारपेठ आज सकाळपासुनच पुर्णपणे बंद होती.व्यापाऱ्यांनी स्वत:हुन आपली दुकाने,हाॅटेल,टपऱ्या आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवुन विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठींबा दर्शविला,परीणामी सेनगाव शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि तालुक्यात ठिक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आणि बंदचे आवाहन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कपिल वाकळे व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय दिलीप वाघमारे,सुनिल मुंदडा,सुदामदादा वाघमारे, प्रकाश भुतकर,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.संगिता मिलींद पडघन,कार्यकारी अध्यक्षा सौ.आशा संतोष चाटसे,सौ.विशाखा विजय मोरे,सौ.सुशिला मदन ठोंबरे,सौ.इंदुबाई खंदारे,चंद्रकला साळवे,आशराबाई साळवे,आकाश सरोदे,वसंत वैराट,गजानन इंगोले,संदीप कांबळे,रामेश्वर भालेराव,किरण सरोदे,मारोती चाटसे,शुभम चाटसे,आदर्श सरोदे,कुलदिप वाघमारे,प्रशांत इंगळे,मधुकर जाधव,जयपाल खंदारे,बाळु लाटे,सिध्दार्थ कांबळे,राहुल वाघमारे,योगेश खंदारे,गजानन खंदारे,अजय खंदारे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बंद दरम्याने शहरात कुठे ही अनुचित प्रकार घडु नये आणि शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी स.पो.नि.संग्राम जाधव यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
सेनगाव शहरातील सर्व व्यापारी बांधव आणि सजग नागरिकांचे आभार-कपिल वाकळे
दिल्लीतील विद्यार्थ्यावरील अन्यायाविरोधात स्वतःहुन दुकाने बंद ठेवुन बंदला पाठींबा देणाऱ्या सेनगावच्या सर्व व्यापारी बांधवांचे आणि सजग नागरीकांचे मी मनापासुन आभार मानतो.अन्यायाविरुध्द या लढ्यात आपले असेच सहकार्य पुढेही असुद्या हिच नम्र विनंती
कपिल वाकळे
सेनगाव तालुकाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी














Add Comment