Crime Editor Choice Hingoli dist

मानव विकासच्या बसचा चालक दारूच्या नशेत,पालकांची कठोर कारवाईची मागणी

मानव विकासच्या बसचा चालक दारूच्या नशेत,पालकांची कठोर कारवाईची मागणी

मद्यधुंद चालकामुळे जीव गेला असता! विद्यार्थिनींच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

दिशा न्युज मराठी २४×७ 

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

सेनगाव प्रतिनिधी /विश्वनाथ देशमुख 

सेनगाव तालुक्यात विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या मानव विकास बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विद्यार्थिनींच्या प्रसंगावधानामुळे आणि गावकऱ्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.याप्रकरणी हिंगोली आगाराचे वाहतुक निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दि.२७ जुलै सोमवार रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कोळसा,सेनगाव,सापडगाव,सुकळी,दाताडा बुद्रुक,दाताडा खुर्द,वटकळी या मार्गावर विद्यार्थिनींना घेऊन जाणारी मानव विकासची बस क्र.एम.एच.०६ एस.८७७५ दाताडा बुद्रुकच्या दिशेने जात होती.यावेळी चालक भरधाव वेगात वाकडी-तिकडी बस चालवत असल्याचा संशय विद्यार्थिनींना आला.त्यांनी तात्काळ बस थांबवण्याची मागणी केली. विद्यार्थिनींनी वेळीच आवाज उठवल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.ही माहिती दाताडा बुद्रुक येथील नागरिकांना मिळताच त्यांनी बस अडवून चालकाला जाब विचारला.यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर दुसऱ्या चालकाला बोलावुन बस हिंगोली आगारात नेण्यात आली.या प्रकरणी दि.२७ जुलै सोमवार रोजी रात्री उशीरा हिंगोली आगाराचे वाहतुक निरीक्षक फिरोज मुस्तफा शेख यांच्या फिर्यादीवरून बस चालक महेश बापुराव कुमरे,रा.रिसाला बाजार,हिंगोली याच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं.४१६/२०२६ कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.राजुदास जाधव हे करीत आहेत.शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बसचा चालकच मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.संबंधित चालकावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याला निलंबित करावे,अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement