वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान व नगरपरिषद वसमत यांच्या संकल्पनेतुन ‘सुरेल संगीत महोत्सव २०२६’
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
दि.०४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वसमत शहरातील रसिकांसाठी शास्त्रीय संगीत,भावगीत,भक्तिगीत आणि अभंगांची सुरेल मेजवानी उपलब्ध होणार असुन.वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि नगर परिषद,वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता ‘सुरेल संगीत महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.हा सांस्कृतिक सोहळा सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह,वसमत येथे रंगणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभुमीवर आयोजित या संगीत महोत्सवात नामवंत कलाकारांच्या सादरीकरणातुन संगीतप्रेमींना विविध संगीतप्रकारांचा आनंद घेता येणार आहे.पुणे येथील प्रसिद्ध गायक श्री.नागेश आडगावकर हे गायन सादर करणार असुन ते सुप्रसिद्ध गायक उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आहेत.त्यामुळे त्यांच्या गायनाची विशेष उत्सुकता वसमतच्या रसिकांमध्ये निर्माण झाली आहे.या कार्यक्रमात मुंबईच्या भरतनाट्यम् कलाकार कु.सानिका शिंदे यांचे नृत्य सादरीकरणही होणार आहे.गायनाला तबल्यावर श्री. प्रशांत गाजरे,बासरीवर अनहद वारसी,संवादिनीवर श्री.मंगेश जवळेकर तर पखवाजावर श्री.विश्वेश्वर कोलंबीकर यांची सुरेल साथ लाभणार आहे.कार्यक्रमास वसुमती नगरीत वाढलेल्या सौ.रूपलक्ष्मी चौगुले (शिंदे) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.त्या प्रसिद्ध सिने-अभिनेत्री असुन प्रा.दत्ता चौगुले यांच्या कन्या आहेत.श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित हा संगीत व नृत्याचा आगळावेगळा सांस्कृतिक सोहळा वसमतकर रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.शहरातील संगीतप्रेमी,कलारसिक आणि नागरिकांनी शुक्रवार,दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित राहुन ‘सुरेल संगीत महोत्सव २०२६’चा आनंद घ्यावा,असे आवाहन आयोजक वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि नगर परिषद,वसमत यांच्या वतीने करण्यात आले आहे.














Add Comment