हट्टा पोलीस ठाण्याचे लोखंडी बॅरिकेट बेवारस अवस्थेत
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
गंज लागुन शासकीय मालमत्तेचे नुकसान,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
महाराष्ट्र शासनाने पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिलेले लोखंडी बॅरिकेट वसमत–परभणी रोडवरील बळेगाव पाटी येथे गेल्या अनेक महिन्यांपासुन बेवारस अवस्थेत पडुन असल्याचे दिसुन येत आहे.सदरील बॅरिकेट हट्टा पोलीस ठाण्याच्या अखत्यारितील असल्याचे सांगण्यात येत असुन,त्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
बळेगाव पाटी परिसरात एकाच ठिकाणी दीर्घकाळ पडुन असल्याने या बॅरिकेटला गंज लागत असुन,शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे.वाहतुक नियंत्रण,बंदोबस्त तसेच अन्य पोलिसांच्या कामकाजासाठी उपयोगी ठरणारे हे बॅरिकेट सध्या वापराविना पडुन असल्याने त्यांची देखभाल व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्याचे बॅरिकेट असल्यामुळे ते चोरीला जाण्याची शक्यता कमी असली,तरी उघड्यावर पडुन राहिल्याने त्यांचे आयुष्य कमी होत आहे.शासकीय निधीतुन उपलब्ध करून दिलेल्या साहित्याची योग्य देखभाल होणे आवश्यक असताना,अनेक महिन्यांपासुन त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन बॅरिकेटची पाहणी करावी,आवश्यक दुरुस्ती करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे,अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.














Add Comment