श्री शिवेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त सार्वजनिक महाप्रसाद उत्साहात संपन्न.
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
शिवभक्तांच्या उत्स्फुर्त सहभागाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण,५ सप्टेंबर रोजी शेवटची पंगत
हिंदु धर्मातील पवित्र व मंगलमय श्रावण मासाचे औचित्य साधुन तसेच शिवभक्तांच्या आग्रहाखातर वसमत शहरातील स्टेशन रोड येथील श्री शिवेश्वर महादेव मंदिरात सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दि.३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाला शहरासह परिसरातील शिवभक्तांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दुपारी १२.०५ वाजता महाआरती करण्यात आली.महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण सुरू करण्यात आले.दुपारी १२.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता.यावेळी भाविकांनी भगवान श्री शिवेश्वर महादेवांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’,‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा स्वीकार करून भगवान शिवेश्वर महादेवांचे आशीर्वाद घेतले.या धार्मिक उपक्रमामुळे मंदिर परिसरात श्रद्धा,सेवा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.
अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते.श्रावण मासाच्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या या सार्वजनिक महाप्रसादाच्या माध्यमातून अन्नदानाची परंपरा जपत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.या उपक्रमासाठी श्री शिवेश्वर महादेव मंदिर अन्नदान समितीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
५ सप्टेंबर रोजी श्रावण मासातील शेवटची पंगत
श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी,शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी,श्री शिवेश्वर महादेव मंदिर येथे महाप्रसादाची शेवटची पंगत आयोजित करण्यात येणार आहे.वसमत शहरातील तसेच परिसरातील तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन भगवान श्री शिवेश्वर महादेवांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन अन्नदान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या पावन सेवाकार्यात सर्व शिवभक्तांनी सहभागी होऊन अन्नदानाच्या या धार्मिक उपक्रमास सहकार्य करावे,अशी नम्र विनंतीही समितीने केली आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व अन्नदाते,शिवभक्त,स्वयंसेवक आणि भाविकांचे श्री शिवेश्वर महादेव मंदिर अन्नदान समितीच्या वतीने मनःपुर्वक आभार व्यक्त करण्यात आले.














Add Comment