Editor Choice Entertainment Fashion

वसमत येथे “गणेशोत्सव २०२६” निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न.

वसमत येथे “गणेशोत्सव २०२६” निमित्त शांतता समितीची बैठवसमत येथे “गणेशोत्सव २०२६” निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न.

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देश,अवैध धंदे व समाजकंटकांवर कठोर कारवाईचा इशारा

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर वसमत येथे दि.१२ सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासनातर्फे शांतता समितीची महत्त्वपुर्ण बैठक सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात पार पडली.या बैठकीस हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणीक लोढा,वसमतचे आमदार राजु नवघरे यांच्यासह प्रशासकीय व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी,लोकप्रतिनिधी,पत्रकार,गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी,अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.अवैध धंदे चालविणाऱ्यांसह सणाचा माहोल बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे पोलीस अधीक्षक डॉ.श्रेणीक लोढा यांनी स्पष्ट केले.कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.गणेशोत्सव हा आनंद,उत्साह आणि सामाजिक सलोख्याचा सण असुन सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन शांततेत व उत्साहात तो साजरा करावा,असे आवाहन बैठकीत करण्यात आले.यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांनी व्यसनमुक्ती आणि व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करणारे विविध उपक्रम राबवावेत,जेणेकरून तरुण पिढीला सकारात्मक दिशा मिळेल,असा सुर यावेळी व्यक्त करण्यात आला.

विद्युत सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना

गणेशोत्सवातील मिरवणुका आणि विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर विद्युत सुरक्षेचा मुद्दाही बैठकीत चर्चिला गेला.महावितरण कंपनीने सण-समारंभाच्या काळात विशेष सतर्कता बाळगावी, अशी सुचना आमदार राजु नवघरे यांनी केली.विशेषतः गणेश विसर्जन आणि मिरवणुकीच्या मार्गावरील लोंबकळणाऱ्या अथवा धोकादायक विद्युत तारांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. कोणतीही दुर्घटना घडु नये यासाठी संबंधित यंत्रणांनी पुर्ण दक्षता घ्यावी,असे त्यांनी सांगितले. बैठकीस उपविभागीय अधिकारी विकास माने,उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे,नगरपालिका मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर,नगराध्यक्षा प्रतिनिधी कन्हैया बाहेती,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ,विद्युत मंडळाचे अधिकारी मंत्री साहेब,वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि उमाकांत पुणे,सपोनि महादेव पुरी,सपोनी संदिप बोरकर,उपनगराध्यक्ष राजु एंगडे यांच्यासह पोलीस पाटील,विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत,सुरक्षित आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.क संपन्न.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement