गरजु महिलेला छत्रीचा आधार,लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडतर्फे इंदुबाई तावडे यांना छत्री वाटप
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
समाजातील गरजु,वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने दि.१३ सप्टेंबर रोजी एका गरजु कष्टकरी महिलेला छत्रीचे वाटप करून सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करण्यात आला.
वसमत शहरातील झेंडा चौक परिसरात फुटाणे व इतर साहित्य विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या इंदुबाई तावडे (वय ६३ वर्षे) यांना ऊन आणि पावसापासुन संरक्षण मिळावे,या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने छत्री भेट देण्यात आली.दैनंदिन उदरनिर्वाहासाठी प्रतिकूल हवामानातही रस्त्यावर बसुन व्यवसाय करणाऱ्या इंदुबाई यांच्यासाठी ही मदत दिलासा देणारी ठरली.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करताना लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी गरजू व्यक्तीची प्रत्यक्ष गरज ओळखुन मदत करण्यावर भर दिला.छत्री वाटपाचा हा छोटेखानी उपक्रम असला तरी कष्टकरी महिलेच्या दैनंदिन जीवनात त्याचे मोठे महत्त्व असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमुद केले.
या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाषसावजी लालपोतु,सराफा असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुल्थे,मन्मथआप्पा बेले,लक्ष्मीकांत कोसळले,सुनील कार्ले,राजु शेठ कापुसकरी,राजुशेठ लालपोतु,माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे आणि नगरसेवक दिलीप पाटील भोसले यांच्या हस्ते इंदुबाई तावडे यांना छत्री प्रदान करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाषसावजी लालपोतु यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईड हा केवळ विविध कार्यक्रम आयोजित करणारा क्लब नसुन समाजातील गरज ओळखुन प्रत्यक्ष मदतीचा हात देणारी सेवाभावी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.इंदुबाई तावडे यांना देण्यात आलेली छत्री ही छोटी मदत वाटत असली,तरी ऊन-पावसात व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी ती निश्चितच आधार ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडचे अध्यक्ष संजीव कुमार बेंडके,माजी अध्यक्ष राजु सिद्दीकी,उपाध्यक्ष गौस बागवान,शेख इमरान शेख नुर,सचिव कल्याण कुरुंदकर,कोषाध्यक्ष संदीप चव्हाण,ॲड.अरुण अंबेकर,बाळासाहेब बेले,समीर कुरेशी,प्रसाद लालपोतु,अंबादास मनी,पिंटु बोखारे,रोहित टेहरे,मन्मथ सिद्धेवार, विजय लांडगु,सचिन दगडु, सुहास काकडे,विक्रम कुंटूरवार,योगेश चेपुरवार,सीए एकनाथ जगताप,राजाराम जगताप,हरिहर अलसटवार,आशीर्वाद इंगोले, आलोक जाधव,शिवानंद लेंडाळे,संदीप टाक,वैजनाथ कदम,ॲड.प्रदीप देशमुख आणि प्रसन्ना देशपांडे आदी उपस्थित होते.
दरम्यान,गरजु महिलेला ऊन-पावसापासुन संरक्षण मिळावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. सामाजिक संस्था,व्यापारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे गरजु व्यक्तींच्या अडचणी समजुन घेत त्यांना प्रत्यक्ष मदत केल्यास सामाजिक बांधिलकी अधिक बळकट होईल,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ बसमत प्राईडच्या वतीने भविष्यातही समाजातील गरजु व वंचित घटकांसाठी विविध सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील,असा विश्वास क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.














Add Comment