Celebration • Editor Choice • Good working

हु.बहिर्जी विद्यालयात ‘वाचन परिवर्तनाची सुरुवात’ या पुस्तकाचा विमोचन समारंभ संपन्न.

हु.बहिर्जी विद्यालयात ‘वाचन परिवर्तनाची सुरुवात’ या पुस्तकाचा विमोचन समारंभ संपन्न.

दहावी मध्ये शिकणाऱ्या कु.कीर्ती जाधवने लिहिले प्रेरणादायी पुस्तक.

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत

दि.२४ ऑक्टोबर रोजी वसमत येथील नामांकित असलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात दहावी मध्ये शिकणाऱ्या कुमारी कीर्ती जाधव या विद्यार्थिनीने वाचन परिवर्तनाची सुरुवात नावाचे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक लिहिले आहे.या पुस्तक प्रकाशन आणि विमोचन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.जी.शेळके सर,तर प्रमुख उपस्थितीमध्ये यल्लाप्पा मिटकर सर होते.या पुस्तकाचे विमोचन आवाकोंडी कथासंग्रहाचे लेखक शिवदास पोटे सर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती एस.व्ही.जाधव,पर्यवेक्षक श्री.डी.आर.बागल, पर्यवेक्षक श्री. के.बी.वायचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,तसेच वाचन संस्कृतीचे जतन व्हावे,या उद्देशाने कुमारी कीर्ती जाधव या विद्यार्थिनीने आपल्या शेकडो पुस्तक वाचनाच्या अनुभवातून वाचन परिवर्तनाची सुरुवात हे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक लिहिले.एक पुस्तक,अनेक विचार आणि परिवर्तनाची नवी सुरुवात या संकल्पनेला धरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड वाचनाची सवय निर्माण होणार आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते कुमारी कीर्ती जाधव या विद्यार्थिनीचा विद्यालयात भव्य सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.आवाकोंडी कथासंग्रहाचे लेखक शिवदास पोटे सर, यल्लाप्पा मिटकर सर,तसेच मुख्याध्यापक पी.जी.शेळके सर या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्य प्रेम, ज्ञानलालसा,वाचन संस्कृती रुजवण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातुन वाचन संस्कृतीला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञान विश्वाचा विस्तार होईल अशी अपेक्षा आपल्या मनोगतात व्यक्त केली.तसेच या कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील विविध खेळातील गुणवंत खेळाडुंचा विशेष सत्कार करण्यात आला.मराठी विभागाच्या वतीने या विद्यार्थिनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एस.ए.कदम यांनी केले‌ तसेच या कार्यक्रमाचे संचलन श्री गजानन नवघरे सर आणि सांस्कृतिक विभागाचे एस.पी.देशमुख यांनी केले.या कार्यक्रमाचे छायांकन साई म्यानेवार यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक बंधु,भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची यांची उपस्थिती होती.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement