वसमत दसरा महोत्सवात पारदर्शक कारभाराचा आदर्श,जमा-खर्चाचा संपुर्ण लेखाजोखा नागरिकांसमोर सादर.
लोकसहभागातुन महोत्सव यशस्वी झाल्याचा आयोजकांचा दावा.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
वसमत येथे गेल्या ४० वर्षांपासुन सुरू असलेली सार्वजनिक दसरा महोत्सवाची परंपरा,पारदर्शक कारभार,लोकसहभाग आणि सर्वसमावेशक नियोजनाच्या माध्यमातुन पुढे नेण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.संत नामदेव महाराज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन आयोजित महोत्सवाच्या निमित्ताने दि. २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दसरा महोत्सवाच्या प्रदर्शनी मैदानात दुध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी महोत्सवादरम्यान झालेल्या विविध कार्यक्रमांचा जमा-खर्चाचा संपुर्ण लेखाजोखा संस्थेचे पदाधिकारी गणेश कोंडीबा काळे यांनी उपस्थित नागरिकांसमोर सादर केला.
या कार्यक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी,नगरसेवक, पत्रकार,प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.सार्वजनिक उत्सवाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती नागरिकांसमोर मांडण्याच्या या उपक्रमामुळे महोत्सवाच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा अधोरेखित झाला.
वसमतच्या सार्वजनिक दसरा महोत्सवानिमित्त गेल्या काही दिवसांपासुन विविध सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दांडिया स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,कृषी प्रदर्शन,शंकरपट,कुस्ती स्पर्धा,देवी स्थापना यांसह विविध उपक्रमांचा समावेश होता.तसेच कार्यक्रमांसाठी मान्यवरांचे मानधन आणि इतर व्यवस्थापनावर झालेल्या खर्चाचाही जमा-खर्चाच्या तपशिलात समावेश करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
महोत्सवातील विविध कार्यक्रमांचे नियोजन,आयोजन आणि खर्चासंदर्भातील निर्णय सर्वांच्या सहमतीने व खुल्या चर्चेतुन घेण्यात आल्याचे आयोजकांकडुन स्पष्ट करण्यात आले.आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांना माहिती देणे आणि सार्वजनिक उत्सवाच्या कामकाजात उत्तरदायित्व जपणे,हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचेही त्यांनी नमुद केले.
दसरा महोत्सवाच्या काळात हजारो भाविक आणि नागरिकांनी प्रदर्शनीला भेट दिली.महिला,युवक,लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला.सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच कृषी प्रदर्शन आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांनाही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.स्थानिक तसेच नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, वसमतची सांस्कृतिक परंपरा जपणे आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे,हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
टीकेला उत्तर देण्यासाठी लेखाजोखा सादर
महोत्सवाच्या आयोजनावरून काहींकडुन टीका आणि अपप्रचार केला जात असल्याचा आरोप आयोजकांनी केला.या पार्श्वभुमीवर महोत्सवातील कार्यक्रम,नियोजन आणि आर्थिक व्यवहारांची माहिती नागरिकांसमोर मांडुन पारदर्शकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद हीच महोत्सवाच्या यशाची पावती असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,देणगीदार,व्यापारी,नागरिक,महिला आणि युवक यांचे आयोजकांनी आभार मानले.भविष्यातही सामाजिक एकोपा,सांस्कृतिक परंपरा आणि लोकसहभागाला प्राधान्य देऊन सार्वजनिक उत्सव अधिक प्रभावीपणे आयोजित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित दुध वाटपाच्या कार्यक्रमातुन सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला.सार्वजनिक उत्सवांचे आयोजन करताना पारदर्शक आर्थिक व्यवहार,खुली निर्णयप्रक्रिया आणि नागरिकांप्रती उत्तरदायित्व जपल्यास नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो,असा संदेश या उपक्रमातुन देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.














Add Comment