Editor Choice • Good working • Maharashtra

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला राजुदादा चापके यांची सांत्वनपर भेट.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला राजुदादा चापके यांची सांत्वनपर भेट.

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथील तरुण शेतकरी ज्ञानेश्वर श्यामराव सांगळे यांनी नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीला कंटाळुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असुन,शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुःखद प्रसंगी शिवसेना वसमत तालुकाप्रमुख तथा शिवसेना (शिंदे गट) नेते राजुदादा चापके यांनी सांगळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.तसेच कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदत केली.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका मांडताना राजुदादा चापके यांनी,दुष्काळी परिस्थिती कितीही गंभीर असली तरी शेतकरी बांधवांनी खचुन न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा,असे आवाहन केले.गरज पडेल तेव्हा शिवसेना शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शेतीतील नापिकी,पावसाची अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील शेतकरी विविध संकटांना सामोरे जात आहेत.अशा परिस्थितीत संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना मानसिक आधार आणि शक्य ती मदत मिळणे महत्त्वाचे आहे.ज्ञानेश्वर सांगळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राजु दादा चापके यांनी दुःखात सहभागी होत मदतीचा हात पुढे केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त करत,गरजु शेतकरी कुटुंबांना आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.“परिस्थिती गंभीर.शिवसेना खंबीर!” या भुमिकेतुन संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement