आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या संकल्पनेतुन १ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे आयोजन.
विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मिळणार संधी
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुर्वतयारी करता यावी तसेच जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे स्वरूप समजुन घेऊन आत्मविश्वासाने परीक्षा देता यावी,या उद्देशाने वसमत येथे रविवार,दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या संकल्पनेतुन तसेच राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान,वसमत यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सराव परीक्षेचे हे सातवे वर्ष असुन,विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा,हा या उपक्रमामागील मुख्य हेतु आहे. परीक्षेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप,वेळेचे नियोजन,प्रश्न सोडविण्याची पद्धत आणि परीक्षेतील आव्हाने यांची ओळख होणार आहे.त्यामुळे नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चितच फायदा होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्यात स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास निर्माण व्हावा,या दृष्टिकोनातुन या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या तयारीचे मुल्यमापन करता येणार असुन,आगामी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी कोणत्या विषयांवर अधिक लक्ष द्यावे,याची दिशा मिळणार आहे.
परीक्षेचे ठिकाण व वेळ
रविवार,दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे केंद्र लालबहादुर शास्त्री (एलबीएस) विद्यालय, परभणी रोड,वसमत येथे निश्चित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सराव परीक्षेत सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीची दिशा देणारा हा उपक्रम ठरणार आहे.














Add Comment