Celebration • Editor Choice • Fashion

वसमतकरांसाठी ‘सांज दीपावली २०२६’ची सुरेल संगीत मैफल.

वसमतकरांसाठी ‘सांज दीपावली २०२६’ची सुरेल संगीत मैफल.

वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ६ नोव्हेंबर रोजी हिंदी-मराठी लोकप्रिय गीतांची मेजवानी छत्रपती संभाजीनगरचे नामवंत कलाकार सादर करणार गीत-संगीताचा कार्यक्रम

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

दिवाळीच्या प्रकाशमय वातावरणात सुरांची उधळण अनुभवण्याची संधी वसमतकरांना मिळणार आहे.वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान, वसमत यांच्या वतीने शुक्रवार,दि.६ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘सांज दीपावली २०२६’ या हिंदी-मराठी लोकप्रिय गीतांच्या सुरेल संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील लोकप्रिय गायिका वर्षा जोशी आणि गायक वैभव पांडे आपल्या सुमधुर स्वरांतून हिंदी व मराठीतील गाजलेली गीते सादर करणार आहेत. त्यांच्या गीतांनी वसमतकरांना अविस्मरणीय संगीतानुभव मिळणार आहे.कार्यक्रमाचे निवेदन श्रीकांत उमरीकर करणार असुन सहकलाकार म्हणुन राजु तायडे (कीबोर्ड),जीवन कुलकर्णी (तबला) आणि अमित निर्मल (ऑक्टापॅड) हे संगीताची साथ देणार आहेत.हा कार्यक्रम शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह,वसमतनगर येथे होणार आहे.

‘कला,क्रीडा,साहित्य,सेवा,संस्कृती याचसाठी आपली वसुमती’ हे ब्रीद जपत वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. दीपोत्सवाचा प्रकाश मनात साठवुन सुरांच्या या दिवाळीचा आनंद घेण्यासाठी वसमतकरांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहावे,असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Featured

Advertisement

Advertisement