मोबाईलपासून दूर पडद्याकडे वळले बालमन
लिट्ल किंग्जमध्ये‘सुभेदार 2’आणि ‘भूतनाथ’ची धमाल;बाल चित्रपट महोत्सवाची रंगतदार सांगता
वसमत येथील लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूल आणि मुक्ताई विद्यालय येथे आयोजित दोन दिवसीय बाल चित्रपट महोत्सवाने विद्यार्थ्यांना अक्षरशः आनंदाच्या नव्या विश्वात नेले.चाईल्ड फिल्म सोसायटी मुंबई,भारत सरकार यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी मोफत.”यशवंत बाल चित्रपट महोत्सव.२०२६”बालचित्रपट प्रदर्शनाची खास मेजवानी शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या महोत्सवात ‘सुभेदार 2’ आणि ‘भूतनाथ’ हे चित्रपट दाखवण्यात आले.मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना मुलांनी टाळ्यांचा कडकडाट, हशा आणि उत्सुकतेने भरलेले क्षण अनुभवले.मात्र,हा केवळ मनोरंजनाचा भाग नव्हता—चित्रपटांमधील शैक्षणिक व नैतिक संदेश विद्यार्थ्यांनी मनापासून आत्मसात केला.
चित्रपट संपताच “हे असं का झालं?”,“यातून काय शिकायला मिळतं?”असे शेकडो प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा व्यक्त केली.यामुळे महोत्सवाला केवळ मनोरंजन नव्हे,तर विचारप्रवृत्त करणारा शैक्षणिक आयाम लाभला.
दोन दिवस शाळेत खाऊ गल्लीचीही धूम होती.मित्रांसोबत गप्पा, खाऊ आणि चित्रपट यामुळे शाळेचा परिसर जणू एखाद्या उत्सवस्थळात परिवर्तित झाला होता.विशेष म्हणजे,या काळात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि पुस्तकांपासून थोडा विरंगुळा घेत निखळ आनंद अनुभवला.
मागील वर्षभर अभ्यास,परीक्षा आणि स्पर्धांमुळे थकलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक विश्रांती मिळावी,तसेच आनंदातून शिक्षणाची गोडी वाढावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
शाळेचे संस्थाचालक प्रा.डॉ.नामदेव दळवी यांनी सांगितले की,“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,सामाजिक जाणीव आणि विचार करण्याची क्षमता विकसित होते.
४ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून,विद्यार्थी नव्या उत्साहाने अभ्यासासाठी सज्ज झाले आहेत.”
बालमनाला स्पर्श करणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि मनात प्रेरणा देऊनच निरोप घेत गेला.














Add Comment