स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वसमत येथे ‘जनसेवा सप्ताह’ नियोजन बैठक संपन्न,विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या आगामी जयंतीचे औचित्य साधुन वसमत येथे ‘जनसेवा सप्ताह’आयोजित करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या पुर्वतयारीसाठी शासकीय विश्रामगृह वसमत येथे दि.१५ जुलै रोजी एका विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत जनसेवा सप्ताहा दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक आणि जनहितार्थ उपक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यात आली.
या सेवा सप्ताहाच्या माध्यमातुन समाजातील विविध घटकांना मदत पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.सप्ताहादरम्यान प्रामुख्याने खालील उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली
वृक्षारोपण मोहीम:पर्यावरण रक्षणासाठी ठिकठिकाणी झाडे लावली जातील.
रक्तदान शिबिर:रुग्णांच्या मदतीसाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाईल.
मोफत आरोग्य शिबिर: नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष वैद्यकीय शिबिर भरवले जाईल.
शैक्षणिक साहित्य वाटप: गरजु आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल.
सामाजिक सेवा उपक्रम: इतर अनेक लोकपयोगी आणि कल्याणकारी कार्यक्रम राबवले जातील.
या नियोजन बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश पतंगे साहेब,राजुभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालुमामा ढोरे,नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती आणि उपनगराध्यक्ष इम्रान अली यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष,तालुकाध्यक्ष,सर्व सन्माननीय नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.














Add Comment