वसमत शहरातील चोऱ्यांची मालिका थांबता थांबेना,पिराणी यांच्या किराणा दुकानात चोरी
पहिल्या चोरीच्या घटनेचा छडा लागत नाही तोच दुसरी घटना समोर.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
गेल्या काही महिन्यांपासुन वसमत शहरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असुन,एका चोरीच्या घटनेचा तपास पुर्ण होण्यापुर्वीच दुसरी घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवस असो अथवा रात्र,चोरट्यांकडुन चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनासमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
दि.२५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री वसमत नगरपरिषद कार्यालयाच्या खालच्या गाळ्यांमध्ये असलेल्या पिराणी यांच्या किराणा दुकानाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले.चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवुन आत प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी वसमत शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडुन घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याने दुकानातुन नेमका किती माल अथवा इतर ऐवज चोरीला गेला,याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी,तसेच मागील चोरीच्या घटनांचा तपास जलदगतीने करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.














Add Comment