श्री देव ओंकारनाथ भगवान यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोली गावातुण अकोली ते औंढा नागनाथ कावड यात्रा संपन्न.
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
श्रीदेवी ओंकारनाथ भगवान यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोली गावातुन पहिल्याच वर्षी दि.२४ ऑगस्ट रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.अकोली ते श्री क्षेत्र औंढा नागनाथ भव्य पाई कावड यात्रेचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.
या कावड यात्रेत परिसरातील शेकडो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला होता.
आकोली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच वर्षीच्या कावड यात्रेच्या यशस्वीतेसाठी नारायण कदम,शरद कदम,नवनाथ कदम,उद्धव कदम,बब्लु कदम,लक्ष्मण कदम,शिवराज भैय्या कदम,संतोष कदम,पंडित भोसले,विवेक कदम,दत्ता कदम,गणपत कदम,डॉ.बालाजी कदम,निवृत्ती कदम,करण कदम,विशाल कदम,सुधाकर कदम,माधव कदम, सुदर्शन कदम,गजानन भाऊ,ज्ञानेश्वर कदम,प्रल्हाद कदम,तुकाराम कदम आणि प्रताप कदम यांच्यासह समस्त आकोली ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कावड यात्रेत आमदार राजुभैय्या नवघरे यांचा उत्साही सहभाग
या पाई कावड यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते स्थानिक आमदार राजुभैय्या नवघरे यांचा प्रत्यक्ष सहभाग.आमदार नवघरे यांनी स्वतःपाई चालत या कावड यात्रेत सहभाग नोंदवला.कावड यात्रेदरम्यान आकोली ग्रामस्थांच्या वतीने आमदार नवघरे यांचे जोरदार आणि आपुलकीचे स्वागत करण्यात आले.
यात्रेदरम्यान कावडधारकांना आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विविध सेवा पुरवण्यात आल्या
‘राजुभैय्या नवघरे मित्र मंडळ’च्या वतीने मार्गात तसेच औंढा नागनाथ येथे भाविकांसाठी अल्पोपहार (नाश्ता) आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
आरोग्य व रुग्ण सुविधा प्रवासात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्यात आली होती.ठिकठिकाणी भाविकांना केळी आणि आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
हर हर महादेव आणि जय भवानीच्या गजरात निघालेल्या या कावड यात्रेमुळे संपुर्ण आकोली ते औंढा नागनाथ परिसर भक्तिमय झाला होता.पहिल्याच वर्षाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातुन मोठे कौतुक होत आहे.














Add Comment