Celebration Good working Music

नागेश आडगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध तर सानिका शिंदे यांच्या भरतनाट्यमने वेधले लक्ष

नागेश आडगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध तर सानिका शिंदे यांच्या भरतनाट्यमने वेधले लक्ष

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत

वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठान व नगर परिषद,वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी संगीत महोत्सवा’तील सुरेल संगीत मैफिलीस रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गायक श्री.नागेश आडगावकर यांच्या भावपुर्ण गायनाने उपस्थित रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या या मैफिलीत भक्तिगीते,भावगीते आणि संगीताच्या विविध रंगांची सुरेल अनुभूती रसिकांना मिळाली.नागेश आडगावकर यांच्या दमदार आणि भावपुर्ण गायनाने सभागृहातील वातावरण संगीतमय झाले.त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फुर्त दाद दिली.
भरतनाट्यम नृत्याविष्कार ठरला विशेष आकर्षण
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सुरमणी प्रा.दत्ता चौगुले यांच्या नात कु.सानिका शिंदे यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचे.भाव,ताल आणि लय यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी सादर केलेल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली.त्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांकडुन उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.संगीत आणि नृत्याच्या या सुरेख संगमामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास वसमतच्या नगराध्यक्षा सौ.सुनिता मनमोहन बाहेती, उपनगराध्यक्ष श्री.राजकुमार एंगडे,माजी नगराध्यक्ष श्री.अब्दुल हफिज अब्दुल रहमान,श्री.दिलीप शिंदे,सौ.रूपलक्ष्मी चौगुले,नगरसेवक सचिन दगडु,आतिश दांडेगावकर, शिवहार डांगे सर,श्रीमती चारूदत्ता चौगुले,काशिनाथ भोसले,विजय कडतन,धनंजय गोरे,कन्हैया बाहेती यांच्यासह शहरातील मान्यवर, संगीतप्रेमी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या आरतीचे यजमान म्हणुन श्री.भारत व सौ.दीपा नामपल्ली तसेच श्री.दिलीप शिंदे व सौ. रूपलक्ष्मी शिंदे यांनी सहभाग घेतला.
सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री.सुनील कबाडे यांनी वसमतचा सांस्कृतिक वारसा व परंपरा विशद केली.कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन श्री.प्रकाश इंगळे यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्री.आनंद बडवणे यांनी केले.संपुर्ण सांगीतिक मैफिलीचे निवेदन श्री.लक्ष्मीकांत जोशी धानोरकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुमती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा.पंजाब अंभोरे,सुनील कबाडे,प्रकाश इंगळे,आनंद बडवणे,लक्ष्मीकांत जोशी धानोरकर,आदित्य देशपांडे,मनोज चव्हाण,वसंत चेपुरवार,जयश्री पाटील व साक्षी जोशी यांनी विशेष पुढाकार घेतला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने संगीत,भक्ती आणि नृत्याचा सुरेख संगम घडवुन आणणाऱ्या या महोत्सवामुळे वसमतच्या सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपत नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.वसमतची सांस्कृतिक परंपरा पुढे चालु ठेवण्यासाठी रसिकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे,असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement