वसमतमध्ये लाडक्या बहिणींनी आमदार राजुभैय्या नवघरे यांना बांधली राखी
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे स्नेहमेळावा स्व.अजितदादांच्या स्मृतींना भावपुर्ण अभिवादन
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त वसमत येथे दि. २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर व ग्रामीणच्या वतीने आमदार राजुभैय्या नवघरे यांच्या संपर्क कार्यालयात राखी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महिला पदाधिकारी व लाडक्या बहिणींनी आमदार राजुभैय्या नवघरे यांना राखी बांधुन भाऊ-बहिणीच्या प्रेम,आपुलकी आणि विश्वासाच्या नात्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व.अजितदादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित महिलांनी भावपुर्ण वातावरणात राखी बांधुन स्नेहाचा हा उत्सव साजरा केला.‘बहिणींच्या प्रेमाची राखी आणि विश्वासाच्या नात्याची गाठ’ या भावनेतुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन शिंदे,नगराध्यक्षा सौ.सुनिता बाहेती,आशा देशमुख,उत्कर्षा बाहेती, गंगुताई त्रिमले,पार्वती वाघमारे,जयमाला गोरे,ज्योती वाहुळे,रूपाली दगडु,पुजा सोनवणे,मनिषा कदम,दिपाली कदम,भाग्यश्री ताई,अयोध्याताई,प्रतिभाताई शिंदे,धम्मा वाघमारे,नेहा बोबडे,आरती जोंधळे,रत्नमाला एंगडे,शोभा सुर्यतळ,इंदु कुंटवाड यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांनी आमदार राजुभैय्या नवघरे यांच्याशी असलेले स्नेहाचे व आपुलकीचे नाते व्यक्त केले.यावेळी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा,तसेच जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ व्हावेत,या भावनेतुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
“बहिणींच्या प्रेमाची राखी… विश्वासाच्या नात्याची गाठ… आणि अजितदादांच्या आठवणींना भावपुर्ण अभिवादन,”अशा भावनिक वातावरणात रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम पार पडला.
आपलं वसमत,आपला राजु या भावनेतुन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये स्नेह,आपुलकी आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.














Add Comment