Uncategorized

महाराष्ट्र राज्य थ्रो बॉल असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी वसमत नगरीचे भुमिपुत्र एम.ए.बारी यांची बिनविरोध निवड.

महाराष्ट्र राज्य थ्रो बॉल असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी वसमत नगरीचे भुमिपुत्र एम.ए.बारी यांची बिनविरोध निवड

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

महाराष्ट्र स्टेट हौशी थ्रो बॉल असोसिएशन ७ साइडच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड अकोला येथील महाराष्ट्र जिल्हा परिषद गेस्ट हाऊस,सिव्हिल लाईन येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे एम.ए.बारी यांची महाराष्ट्र राज्य थ्रो बॉल असोसिएशनच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त टी.ए.सौर होते.प्रमुख पाहुणे म्हणुन फिरोज खान उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीस असोसिएशनचे सचिव सतीश यादव यांनी सभेची नोटीस व त्यातील विविध विषय सभासदांसमोर वाचुन दाखविले.यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन आवश्यक ठराव मंजुर करण्यात आले.

यानंतर निवडणुकीचा विषय सभेसमोर आला.त्यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी निवडणूक याच सभेत घेण्यात यावी तसेच कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात यावी,असा आग्रह धरला. त्यानुसार सभासदांच्या सहमतीने निवडणुक प्रक्रिया पार पडली.या निवडणुकीत एम.ए.बारी यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रा.एकनाथ साळुंके (छत्रपती संभाजीनगर),उपाध्यक्षपदी रमेश किसनराव शिंदे (जालना),सचिवपदी रवि शंकरराव कल्ले (अकोला),सहसचिवपदी सुनील महावीर पंढरे (बीड) आणि कोषाध्यक्षपदी एम.ए.बारी वसमत (जि.हिंगोली) यांची निवड झाली.तसेच कार्यकारी सदस्य म्हणुन निलेश सतीश मुरकुटे आणि संगम जयराम डंगर (रायगड) यांची निवड करण्यात आली.

ही कार्यकारिणी सप्टेंबर २०२६ ते सप्टेंबर २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहे.थ्रो बॉल खेळाच्या विकासासाठी तसेच राज्यातील खेळाडुंना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातुन विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सभेसाठी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त टी.ए.सौर, सतीश यादव,फिरोज खान,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रा.एकनाथ साळुंके,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त बळवंत निकुंब,रवि कल्ले,रमेश शिंदे,डॉ.सुनील पंढरे,एम.ए.बारी,संगम डंगर,निलेश मुरकुटे, दादाजी खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.

एम.ए.बारी यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.आमदार राजु भैया नवघरे,जगजीतराज खुराना,प्रवीण शेळके सर (मुख्याध्यापक) आणि फिरोज पठाण यांनी एम.ए.बारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement