Crime Hingoli dist Hingoli police

तु पोलिसांना माहिती देतो म्हणुन तरुणाचा विटेने मारहाण करून खुन,वसमतयेथील सोमवारपेठ परिसरातील घटना.

तु पोलिसांना माहिती देतो म्हणुन तरुणाचा विटेने मारहाण करून खुन

वसमतमधील सोमवारपेठ परिसरातील घटना,तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

तु पोलिसांना माहितीची टीप देतो,या कारणावरून तिघांनी संगनमत करून एका २२ वर्षीय तरुणास विटेने गंभीर मारहाण करून त्याचा खुन केल्याची धक्कादायक घटना वसमत शहरातील सोमवारपेठ परिसरात घडली.या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पवन माणिकराव डाखोरे वय २७ रा. पळसगांव ता.वसमत,यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात रुषिकेश कंठाळे,अर्जुन बोचकरी आणि अनिकेत देवकर,सर्व रा.वसमत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेतील मृताचे नाव गणेश डिंगांबर गुंडाळे (वय २२ रा.रुपला पांढरी,ता.पुर्णा,जि.परभणी,सध्या रा.पाटीलनगर वसमत) असे आहे.

पोलिस प्रशासनाच्या प्राप्त माहितीनुसार नुसार,दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री सोमवारपेठ,वसमत परिसरात ही घटना घडली असुन पोलिसांना टीप देतो,या कारणावरून आरोपींनी संगनमत करून गणेश गुंडाळे यास विटेने गंभीर मारहाण केली.या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीनुसार नमुद आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असुन, दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी भारतीय न्याय संहिता मधील कलमा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सपोनि परगेवार करीत असुन,वृत्तलीहेपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही.वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement