हिंगोली जिल्हा पोलीस घटकातील रिक्त पदासाठी ची पोलीस भरती ही दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ पासुन होणार असुन बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी किंवा ज्या उमेदवारांना हिंगोली जिल्ह्यात राहण्याची सुविधा नाही त्यांच्यासाठी नवीन पोलीस वसाहत कम्युनिटी हॉल येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे कुणीही रस्त्यावर किंवा ग्राउंड च्या बाजूला इतरत्र झोपू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पोलीस भरतीसाठी येताना सहा पासपोर्ट फोटो व ऑनलाइन अपलोड केलेले डॉक्युमेंट्स घेऊन यावे.तसेच पोलीस भरतीमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही फुटेज व आर एफ आय डी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची सुद्धा मदत घेण्यात आली असून कुणीही गैरप्रकार करनार नाही याबाबत काळजी घेतली आहे.तसेच कुणीही उत्तेजक द्रव्य किंवा पदार्थाचे सेवन करू नये स्टेरॉईड वगैरे घेऊ नये तसेच सामान्य शूज पेक्षा इतर स्पाईक शूज किंवा असामान्य शूज वापरू नये व किमती सामान सुद्धा सोबत आणू नये असे जिल्हा पोलीस अधीक्षक मा.डॉ.श्री नीलाभ रोहन यांनी सांगितले आहे.
तसेच पोलीस भरती उमेदवारांचे नातेवाईक असणारे पोलीस अंमलदार यांना पोलीस भरती पासून दूर ठेवण्यात आले आहे. पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस भरती २०२६ दि.११ फेब्रुवारी पासुन सुरुवात.













Add Comment