Editor Choice Maharashtra Maharashtra crimes

वसमत शहर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी,काही तासांत मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस

वसमत शहर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी,काही तासांत मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस

दिशा न्युज मराठी २४×७
संपादक/ गिरीश देशमुख

पोलीस स्टेशन वसमत शहरी येथे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी तक्रारदार दत्ता विनोद सोन्नर (खाजगी नोकरी कुरिअर डिलिव्हरी )रा.मरसुळ ता.वसमत यांनी तक्रार दिली होती
दि १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७ वाजेच्या सुमारास करुणा मॅनेजमेंट सर्विसेस लि.पुणे येथून वसमत येथील अष्टविनायक एजन्सी साठी साईराज ट्रॅव्हल्स द्वारे पाठविण्यात आलेले पार्सल सॅमसंग कंपनीच्या बॉक्स ज्यामध्ये सॅमसंग कंपनीचे अँड्रॉइड १२ मोबाईल किंमत ७,३७०,५३ रुपये आहे.
बस स्थानक वसमत येथे खुराणा ट्रॅव्हल्स ने आले होते ते पार्सल ऑफिस समोर ठेवले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घेऊन गेले बाबत तक्रार दिली त्यावरून वसमत पोलीस स्टेशनचे शहर येथे गुन्हा र नंबर ९०/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पो.निरीक्षक एस.बी.डेडवाल यांच्याकडे देण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपास सपोनी डेडवाल साहेब व त्यांचे सोबत डी.बी.पथक अमलदार संभाजी लेकुळे,नागोराव बाभळे,नितीन रामदिनेवार यांनी मा.पोलीस अधीक्षक हिंगोली निलाभ रोहन साहेब,मा.अप्पर पोलीस अधीक्षक मीना साहेब,उपविभागी पोलीस अधिकारी केंद्र साहेब,मा पोलीस निरीक्षक पो.स्टे.वसमत शहर सुधीर वाघ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास केला सदर गुन्ह्याचे तपासात सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने आरोपी नामे शेख अरबाज शेख अफसर रा.दर्गा मोहल्ला वसमत यास ताब्यात घेऊन त्यास गुन्हा संबंधित विश्वासात घेऊन विचारपूस करून आरोपीचे ताब्यातून गुन्ह्यातील गेलेल्या सॅमसंग कंपनीचे.अँड्रॉइड मोबाईल १२ मोबाईल ज्यांची किंमत ७,३७०,५३ रुपये मुद्देमाल हस्तगत केला
सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नी.डेडवाल हे करीत आहेत.

वरील गुन्ह्याची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे माननीय श्री नीलम रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी कौतुक केले

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement