Celebrities Editor Choice Maharashtra

हट्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान

हट्टा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान.

पुष्पक देशमुख यांच्या आंदोलनाला यश.

दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख

वसमत तालुक्यातील हट्टा येथे दि.१४ फेब्रुवारी रोजी धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे अहिरे पाटील यांनी गावातील शिवभक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले होते की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असुन त्यांच्या स्मारकासाठी आम्हाला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही.
हट्टा येथील ग्रामपंचायत सदस्य श्री पुष्पक देशमुख यांना बाळराजे अहिरे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक गाव गावासाठी भेट दिले असुन दि.१९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या मुहूर्त साधुन हट्टा येथील शिवभक्तांनी पोलिस प्रशासनास
नजुमानता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य असा अश्वारूढ पुतळा पोलीस स्टेशन हट्टा समोरील नियोजित जागेवर विराजमान केला
दि.१४ फेब्रुवारी पासुन सदरील नियोजित जागेवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दि‌.१८ फेब्रुवारी स्मारकाच्या नियोजित जागेवर चौथरा बसवण्याच्या कारणावरून परवानगी नसल्यांचे कारण समोर करत पोलीस प्रशासनाने काम रोखले होते‌.
हट्टा येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे प्रवक्ते श्री पुष्पक देशमुख हे हट्टा येथील बी.एस.एन.एल.च्या टाॅवर वर चढुन छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची परवानगीची मागणी करत आंदोलन करत होते.
त्या आंदोलनास रात्री उशिरा वसमतचे उपविभागीय अधिकारी श्री विकास माने व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी हट्टा येथे आंदोलन स्थळी भेट घेतली व कार्यकर्त्यांशी संवाद साधला व पुष्पक देशमुख यांचे समाधान केले होते.
शिवजयंतीची संधी साधुन हट्टा येथील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा शिवभक्तांसाठी नियोजित जागेवर विराजमान केला.
शिवभक्तांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह यावेळी दिसून आला “जय शिवाजी जय शिवराय” अशा घोषणाने परिसर दणाणून गेला होता
डीजेच्या तालावर ठेका धरत आनंदाने नाचतांनां शिवभक्त दिसुन आले.
यावर्षी वेगळा असा उत्साह शिवभक्तांचा चेहऱ्यावर दिसत होता दि.१९ फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्र व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवसांब घेवार यांनी हट्टा गावासभेट दिली पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी शिवस्मारक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement