Education Health & Fitness Hingoli dist

लिट्ल किंग्ज शाळेत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

माजी सैनिक तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिरंदाज अमोल बोरिवाले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

वसमत /तालुका प्रतिनिधी

लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली तथा हिंगोली जिल्हा तिरंदाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लिट्ल किंग्ज शाळेच्या क्रीडांगणावर दि.३ मे ते ८ मे दरम्यान आयोजित सहा दिवसीय धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या शिबिरात वसमत शहरातील सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत धनुर्विद्येचे प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण घेतले.

या शिबिरात भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक तथा प्रख्यात तिरंदाज अमोल बोरीवाले यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
सन २०१२ पासून ते वसमत येथे सातत्याने धनुर्विद्या शिबिरे घेत असून त्यांनी नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (NSNIS), पतियाळा येथून २०२१-२२ मध्ये स्पोर्ट्स प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मागील काही वर्षांपासून ते महाराष्ट्रातील विविध धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भारतीय शालेय खेळ महासंघ व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ सुवर्ण,३ रौप्य व २ कांस्य पदके मिळवली आहेत.तसेच हिंगोली,नांदेड व परिसरातील जिल्ह्यांमध्ये धनुर्विद्या खेळाचा प्रचार-प्रसार व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी या खेळात प्राविण्य मिळवावेत यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत.
अपंगत्वावर मात करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य.
माजी पॅराट्रूपर अमोल बोरिवाले हे युद्धादरम्यान झालेल्या दुर्दैवी माईन ब्लास्टमध्ये गंभीर जखमी झाले होते.या दुर्घटनेनंतर वैद्यकीय कारणास्तव त्यांना सैन्यातून निवृत्त व्हावे लागले.पुनर्वसनाच्या काळात त्यांनी तिरंदाजी खेळ स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी अनेक यश संपादन केले.
आजपर्यंत त्यांनी राष्ट्रीय स्तरावर २० सुवर्णपदके तर राज्य स्तरावर १० सुवर्णपदके जिंकली आहेत.महाराष्ट्र शासनाकडून त्यांना प्रतिष्ठेचा ‘एकलव्य’पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, त्यांच्या प्रशिक्षणातून तयार झालेले अनेक विद्यार्थी आज शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असून काहींनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे यश मिळवले आहे.
शिबिराच्या समारोपा निमित्त लिट्ल किंग्ज इंग्लिश स्कूलच्या मुक्ताई सभागृहात सहभाग प्रमाणपत्र वितरण व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावी डॉ.अजय मुंदडा,आर.बी.साळुंखे हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघ सचिव,येऊ शिक्षक बालाजी जाधव डॉक्टर अशोक वडवळे अमोल शर्मा.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिबिरातील अनुभव व्यक्त करत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अमोल बोरिवाले यांचे आभार मानले.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement