Editor Choice Health & Fitness Hingoli dist

वसमत उपजिल्हा रुग्णालयची आरोग्य उपसंचालकांकडुन पाहणी, ‘रिपाई’ कार्यकर्त्योंनी वाचला रुग्णालयाच्या समस्यांचा पाढा.

 

वसमत / तालुका प्रतिनिधी

दि.५ मे रोजी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयास आरोग्य सेवा लातुर मंडळाच्या उपसंचालिका डॉ.कांचन वानेरे यांनी भेट देऊन सविस्तर पाहणी केली.या दौऱ्यादरम्यान ‘रिपाई’ (आठवले गट) कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील विविध प्रलंबित समस्यांबाबत निवेदन सादर केले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष कैलास निकाळजे यांनी डॉ.वानेरे यांची भेट घेऊन वसमत उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांचे पाढे वाचले.

स्वच्छता सेवांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली या निवेदनात रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘साई एजन्सी’चे संचालक किरण जगताप यांच्या कामकाजाची चौकशी करून तातडीने कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली.रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा खालावल्याने रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले.

ETP व STP प्रकल्प तातडीने सुरू करण्याची मागणी

रुग्णालयातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले ETP (Effluent Treatment Plant) आणि STP (Sewage Treatment Plant) प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याची बाब समोर आली.हे प्रकल्प तातडीने सुरू करून प्रदूषणाचा प्रश्न सोडवावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

या पाहणी दौऱ्यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ.वानेरे यांनी विविध विभागांची पाहणी करून आरोग्य सेवांचा आढावा घेतला.मांडण्यात आलेल्या तक्रारींवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

या प्रसंगी रिपाईचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement