Crime Editor Choice Vasmat city

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई

वसमत / तालुका प्रतिनिधी

 दि. ४ मे रोजी वसमत येथील कौठा रोड परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर प्रशासनाने कारवाई केली. MH26 CV 2521 क्रमांकाचे हे वाहन उपविभागीय अधिकारी श्री. विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत मंडळ अधिकारी राजू क्षीरसागर,शिवानंद झोळगे तसेच ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे,अमोल इंगळे, सुधीर इंगळे,धुमाळ,गायकवाड यांनी सहभाग घेतला. संबंधित हायवा वाहन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement