Editor Choice Maharashtra Vasmat city

साई सेवा गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषण, ग्राहकाचा प्रशासनावर गंभीर आरोप

 

 

वसमत/तालुका प्रतिनिधी

 

वसमत येथील ‘श्री साई सेवा गॅस एजन्सी’ कडून ग्राहकांची होणारी अडवणुक आणि गॅस सिलिंडर वितरणातील सावळागोंधळ या विरोधात आता आक्रमक पाऊल उचलण्यात आले आहे.वारंवार तक्रार करूनही जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने,त्रस्त ग्राहक कोंडीबा गौनाजी मस्के यांनी दि.१ मे (महाराष्ट्र दिन) रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार कोंडीबा मस्के यांनी दि.१७ मार्च २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने गॅस बुकिंग केले होते.मात्र,गॅस एजन्सीकडून महिनाभर उलटूनही गॅसचा पुरवठा करण्यात आला नाही. यासंदर्भात एजन्सीच्या मालक अनिता अर्जुन इंगोले यांच्याकडे विचारणा केली असता,त्यांनी उपस्थित लोकांसमोर उद्धट वर्तन करून अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप मस्के यांनी पत्रात केला आहे.

काळाबाजार आणि भ्रष्टाचाराचा आरोप

तक्रारदाराने पत्रात असा धक्कादायक दावा केला आहे की,गॅस टंचाईचे कारण सांगून सामान्य ग्राहकांना सिलिंडर नाकारले जात असताना दि.२५ मार्च रोजी एका अनोळखी व्यक्तीमार्फत १३०० रुपये घेऊन गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आला.”मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने माझ्याकडून जास्त पैसे घेता येत नाहीत,याच रागातून मला गॅस दिला जात नाही,”असा संताप मस्के यांनी व्यक्त केला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणाची लेखी तक्रार दि.१७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली होती.परंतु १५ दिवस उलटूनही प्रशासनाने गॅस एजन्सीवर कोणतीही कारवाई केलेली नाही.उलट प्रशासनाकडून एजन्सीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत, मस्के यांनी आता थेट उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

यांना पाठवल्या पत्राच्या प्रती

या आंदोलनाची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व नागरी पुरवठा मंत्री,इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर (मुंबई व दिल्ली) आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.

“जोपर्यंत संबंधित गॅस एजन्सीचा परवाना निलंबित केला जात नाही,तोपर्यं

त उपोषण सुरूच राहील,”असा पवित्रा तक्रारदाराने घेतला आहे.आता यावर प्रशासन काय भूमिका घेते,याकडे सर्व वसमतकरांचे लक्ष लागले आहे.साई सेवा गॅस एजन्सी वसमत विरोधात अनेक तक्रारी येऊन सुद्धा प्रशासनास एवढेे सुस्त का,कारवाई का होत नाही.एकतर प्रशासन व एजन्सी यांच्यात आर्थिक व्यवहार होत आहे,नाहीतर राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नाही अशी चर्चा वसमत शहरातिल नागरिकांना कडुन ऐकायला मिळत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement