सलग विजयांची परंपरा कायम,परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार राजुभैय्या नवघरे यांचा दणदणीत विजय
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आमदार राजुभैय्या नवघरे यांनी ५८ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला.त्यांच्या प्रतिस्पर्धी तुषार जाधव यांना २० मते मिळाली,तर एक मत बाद झाले.या निकालामुळे सहकार क्षेत्रात आमदार नवघरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
राजकारणातील अनेक चढ-उतार आणि बदलत्या समीकरणांमध्येही जनतेशी कायम जपलेली नाळ, सातत्यपुर्ण जनसंपर्क आणि विकासकामांप्रती असलेली बांधिलकी यामुळे आमदार राजुभैय्या नवघरे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.विशेष म्हणजे,त्यांनी आतापर्यंत लढविलेल्या प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवत सलग विजयांची परंपरा कायम राखली आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासुन लोकप्रतिनिधीपर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्ष,संयम आणि सातत्यपुर्ण जनसेवेचा राहिला आहे.मतदारसंघातील रस्ते,पाणी,शिक्षण,आरोग्य,शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांसह विविध विकासकामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्यामुळे ते केवळ राजकीय नेते म्हणुन नव्हे,तर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे लोकनेते म्हणुनही ओळखले जातात.
कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते,सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.निवडणुक असो किंवा जनतेचा प्रश्न,त्यांनी नेहमीच संयमी,शांत आणि विकासाभिमुख भुमिका घेतली आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील हा विजय केवळ एका पदापुरता मर्यादित नसुन सहकार क्षेत्रातील त्यांच्या वाढत्या प्रभावाची नोंद मानला जात आहे.निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत एकमेकांना मिठाई भरवुन आनंद साजरा केला.
या विजयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सलग विजयांची परंपरा आणि जनतेच्या विश्वासाची शिदोरी घेऊन आमदार राजुभैय्या नवघरे यांची राजकीय वाटचाल अधिक सक्षमपणे पुढे सुरू असल्याची भावना कार्यकर्ते व समर्थकांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.














Add Comment