Editor Choice Good working Health & Fitness

वसमत उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्याची मागणी,किडनी रुग्णांसाठी नेफ्रोलॉजिस्टची नियमित सेवा देण्याचे निवेदन

वसमत उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्याची मागणी,किडनी रुग्णांसाठी नेफ्रोलॉजिस्टची नियमित सेवा देण्याचे निवेदन

आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची परवड,रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रशासनाला तातडीच्या कारवाईचे साकडे

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

दि.१४ जुलै रोजी वसमत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.उपजिल्हा रुग्णालय,वसमत येथे सोनोग्राफी,सीटी स्कॅन व एमआरआय यांसारख्या अत्यावश्यक निदान सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच किडनी रुग्णांसाठी नेफ्रोलॉजिस्टची नियमित सेवा सुरू करण्याची प्रमुख मागणी या निवेदनातुन करण्यात आली.

समितीने दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,वसमत तालुक्यात सुमारे १८० गावे असुन हजारो नागरिक आरोग्य उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत.मात्र,सीटी स्कॅन आणि एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी नांदेड किंवा इतर शहरांमध्ये जावे लागते.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असुन उपचारासाठी वेळेचा विलंब होऊन गंभीर रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.

यापुर्वीही या सुविधांसाठी प्रसारमाध्यमांतुन पत्रकार मोर्डन कादरी यांनी वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते.मात्र,अद्यापही या मागणीची पुर्तता झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे की,उपजिल्हा रुग्णालयात किडनी रुग्णांसाठी नेफ्रोलॉजिस्टची दरमहा भेट होणे अपेक्षित असताना गेल्या दोन महिन्यांपासुन तज्ज्ञ डॉक्टरांनी भेट दिलेली नाही.परिणामी किडनी रुग्णांना नियमित तपासणीसाठी नांदेड येथे जावे लागत असुन त्यांना शारीरिक,मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच किडनी रुग्णांसाठी आवश्यक असलेली औषधे व इंजेक्शन्सही उपजिल्हा रुग्णालयात नियमित उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गोरगरीब व गरजु रुग्णांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून उपजिल्हा रुग्णालय,वसमत येथे सीटी स्कॅन व एमआरआय सुविधा सुरू कराव्यात,नेफ्रोलॉजिस्टची नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मोईन कादरी यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती आरोग्यमंत्री,वसमतचे आमदार,जिल्हाधिकारी हिंगोली,जिल्हा शल्यचिकित्सक,उपविभागीय अधिकारी वसमत आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

निवेदन रुग्ण हक्क संरक्षण समितीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष मोईन कादरी,जिल्हा उपाध्यक्ष,आवेस अन्सारी जिल्हा उपाध्यक्ष अमीन मैलाना वसमत तालुकाध्यक्ष,रुपेश इंगळे हिंगोली तालुकाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे कळमनुरी तालुका अध्यक्ष शमशेर अली खान पठाण वसमत शहराध्यक्ष मुनव्वर फारुकी,महिला तालुकाध्यक्षा व महिला शहराध्यक्षा यांच्या वतीने देण्यात आले

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement