Uncategorized

हिंगोली जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी २०२६, वयवर्ष १९ वर्षा खालील खेळाडुंसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा

हिंगोली जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी २०२६,
१९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा.
वसमत / तालुका प्रतिनिधी

दि.१५ ते १७ मे रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेसाठी हिंगोली जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ पाठविण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय येथे या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असुन मंगळवार दि.१२ मे रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हिंगोली जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ या निवड चाचणी स्पर्धेतून निश्चित करण्यात येणार आहे.अंतिम निकालानुसार ४ मुले व ४ मुली अशा एकूण ८ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.
सदर निवड चाचणी स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.१०० ठेवण्यात आली आहे.ही स्पर्धा १९ वर्षांखालील म्हणजेच ०१/०१/२००७ नंतर जन्मलेल्या खेाडूंसाठी खुली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी स्वतःचा बुद्धिबळ पट, सोंगट्या,जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी सोबत आणावे, असे आयोजकांनी कळविले आहे.स्पर्धेचे प्रवेश अर्ज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे स्वीकारले जाणार आहेत.
हिंगोली जिल्हा बुद्धिबळ संघटना स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा,असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क:
एम.ए.बारी सर (जिल्हा सचिव) – ८८५६८८१३५७
मा.नवीन शेळके सर – ७६२०४८८१८०
फिरोज पठाण सर – ७०२०८७४९७८

Advertisement

Advertisement