Crime Hingoli dist Maharashtra

अवैध वाळु वाहतुक करणारे टिप्पर पकडुन २० लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वसमत/तालुका प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडुन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.मा.डॉ.नीलाभ रोहन,पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या निर्देशानुसार सर्व पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दि.१३ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन हट्टा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की,चिखली फाटा परिसरातून एक टिप्पर अवैधरित्या रेती वाहतुक करून चोरटी विक्री करण्यासाठी जात आहे.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन संबंधित टिप्पर थांबविला.चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव संतोष चांगदेव नरवाडे (वय ३५,रा.ढवुळगाव) असे सांगितले.तसेच रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.टिप्पर मालक उद्धव जगताप (रा.हट्टा) यांच्या सांगण्यावरून रेतीची अवैध वाहतुक करीत असल्याची कबुली चालकाने दिली.
यावरून टिप्पर क्रमांक एमएच ३८ एक्स ६६११ चालक संतोष चांगदेव नरवाडे व टिप्पर मालक उद्धव जगताप यांच्या विरोधात पोलीस स्टेशन हट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अंदाजे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई डॉ.नीलाभ रोहन,पोलीस अधीक्षक हिंगोली तसेच श्री कमलेश मीना,अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पोनि मोहन भोसले,पोउपनि माधव जिव्हारे,पोलीस अंमलदार विक्की कुंदनानी,आझम प्यारेवाले,विशाल खंडागळे,किशोर सावंत व पाईकराव मेजर यांच्या पथकाने सहभाग घेतला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement