Editor Choice Good working Hingoli dist

अपघात कमी करणेसाठी विशेष मोहीम.वाहतुक शाखा व पोलीस स्टेशन तर्फे अपघात प्रवण स्थळावर वाहनांची तपासणी

अपघात कमी करण्यासाठी विशेष मोहीम,अपघात प्रवण स्थळांवर वाहनांची तपासणी
वसमत /तालुका प्रतिनिधी
मा.पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी हिंगोली जिल्हा वाहतूक शाखा व सेनगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ मे रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान सेनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अपघात प्रवण स्थळांवर वाहनांची तपासणी करण्यात आली.रिसोड रोडवरील कोळसा,वटकळी तसेच जिंतूर रोडवरील भानखेडा,हत्ता नाईक टी-पॉईंट आणि लिंबाळा तांडा टी-पॉईंट येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत ओव्हरस्पीड,विनाहेल्मेट वाहनचालक तसेच अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली.एकूण ४८ प्रकरणांमध्ये ६९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सदर कारवाई जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार संदीप जाधव,सुखदेव जाधव तसेच सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के,पोलीस शिपाई संतोष जाधव,गजानन कुंडकर आणि चालक परमेश्वर क्षीरसागर यांनी संयुक्तपणे पार पाडली.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement