वसमत येथील नवनियुक्त तहसीलदार सागर नन्नावरे यांचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सत्कार तालुक्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा
वसमत / तालुका प्रतिनिधी
वसमतचे नवनियुक्त तहसीलदार मा.श्री.सागर नन्नावरे साहेब यांनी नुकताच वसमत तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला असुन,’व्हॉईस ऑफ मीडिया’ वसमत तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त तहसीलदार नन्नावरे साहेब यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान पत्रकार बांधवांनी तहसीलदार साहेबांसोबत वसमत तालुक्यातील सर्वसामान्यांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित समस्यांविषयी सविस्तर चर्चा केली.लोकहितैषी मुद्द्यांवर प्रकाश टाकत तालुक्यातील प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तहसीलदार सागर नन्नावरे यांनी देखील सर्व विषयांचा गांभीर्याने विचार करत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.तालुक्यातील प्रशासकीय कामकाज पारदर्शक ठेवण्यासोबतच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहू,असे सांगत त्यांनी पत्रकार संघटनेला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
या सदिच्छा भेट व सत्कार प्रसंगी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’वसमत पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार संजयजी बर्दापुरे,शमीम भाई सिद्दिकी,प्रा.नामदेव दळवीसर,गिरीश देशमुख,साईनाथ पतंगे,ॲड.नाहीद सिद्दिकी,एजाज शेख,नितीन वाघिले आणि मुन्ना फारुकी यांच्यासह तालुक्यातील इतर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसमत येथील नवनियुक्त तहसीलदार सागर नन्नावरे यांचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सत्कार तालुक्यातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा













Add Comment