महाराष्ट्र राज्यातील ५३ पोलीस घटकात हिंगोली पोलीस घटक CCTNS कामगिरीत प्रथम
वसमत/ तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रथम नंबर (TOP – 01) मध्ये
सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर २०१५ पासुन चालु झालेली आहे.डॉ.नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक,हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन चे कामकाज ऑनलाईन चालते.त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार घेवुन ती ऑनलाईन करुन गुन्हा दाखल केल्या जातो व त्या गुन्ह्याचा सर्व तपास हा वेळे मध्ये सीसीटीएनएस प्रणाली मध्ये भरण्यात येतो.तसेच या प्रणाली द्वारे आरोपींचा पूर्व इतिहास पडताळून त्यांचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येतात.हिंगोली जिल्हयामध्ये सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणुन मा.श्री.कमलेश मीना साहेब अपर पोलीस अधीक्षक हिंगोली हे कामकाज पाहतात. मा.श्री.कमलेश मीना अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन ला सीसीटीएनएस कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अंमलदार यांची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यातश आली असुन सदर पर्यवेक्षक अंमलदार यांच्या कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणुन नेमणुक केलेली आहे.सदर सीसीटीएनएस देखरेख अधिकारी व सीसीटीएनएस पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला सीसीटीएनएस शाखा,हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु पांडुरंग हमाने,पोलीस अंमलदार राहुल परमेश्वर तडकसे,महिला पोलीस अंमलदार पुजा सखाराम जाधव यांचे मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगडित असलेले सर्व प्रकारचे पोर्टल जसे सीसीटीएनएस,आयसीजेएस,आयटीएसएसओ,क्रायमॅक व इतर प्रकारचे पोर्टलबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण दिल्या जाते तसेच प्रणालीशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेळोवेळी कामकाज करुन घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो.त्यामुळे जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते.
प्रत्येक महिण्याला गुन्हे अन्वेशन विभाग,महाराष्ट्र राज्य पुणे हे महाराष्ट्र राज्यातील ५३ घटकांच्या CCTNS कामगिरी बाबतचा आढावा घेवुन दर महिण्याला प्रत्येक घटकाला गुणांकण देते.फेब्रुवारी २०२६ महिण्यात हिंगोली घटकाला CCTNS कामगिरीमध्ये २०१ पैकी २०१ गुण मिळाल्याने हिंगोली जिल्हयाची १००% कामगिरी असल्याने हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
मा.श्री.नीलाभ रोहन साहेब पोलीस अधीक्षक,हिंगोली व मा श्री.कमलेश मीना साहेब अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले व स.पोलीस निरिक्षक शिवसांब घेवारे तसेच सीसीटीएनएस शाखा,हिंगोली येथे जिल्हयाचे सीसीटीएनएस स्पोक म्हणुन कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु पांडुरंग हमाने,पोलीस अंमलदार राहुल परमेश्वर तडकसे,महिला पोलीस अंमलदार पुजा सखाराम जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी,सीसीटीएनएस देखरेख अधिकारी,सीसीटीएनएस पर्यवेक्षक/अंमलदार केशव पुंड,सुमन काळे,राम धुमाळ,गजानन शिंदे,भारत डाखुरे,केतन तायडे,पुजा पवार,अमोल अडकिणे,राहुल राठोड,मंगेश नरवाडे,लक्ष्मण हगवणे,मीना सानप,विश्वनाथ दळवे,सिता पोले,नामदेव जाधव,रमेश बोरकर या सर्वानी वेळेत सीसीटीएनएस कामकाज केल्याने माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्रात हिंगोली जिल्हा पहीला आलेला आहे. सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनिय आहे.
सदरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन व त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.














Add Comment