हु.बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक:गिरीष देशमुख
वसमत येथील नामांकित हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दि. २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग व नॅक (NAAC) यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मा.मा.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमासाठी मुख्य योग प्रशिक्षक म्हणून मदनराव शिंदे उपस्थित होते. त्यांनी प्राध्यापक,प्राध्यापिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली आणि त्यांच्याकडूनही ती करून घेतली.यावेळी त्यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत विविध आसनांची सविस्तर माहिती दिली.नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते,असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.सुभाष क्षीरसागर,शारीरिक शिक्षण विभागाचे डॉ.नागनाथ गजमल,क्रीडा संचालक निरंजन आकमार तसेच नॅक समन्वयक डॉ.नरसिंग पिंपरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
योग साधना शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमामुळे योगाविषयी जनजागृती होण्यास मदत झाली असून उपस्थितांनी योगाचा नियमित सराव करण्याचा संकल्प व्यक्त केला.














Add Comment