Crime Editor Choice Hingoli police

कारची काच फोडुन १० लाखांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारची काच फोडून १० लाखांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद,५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दिशा न्युज मराठी २४×७,मुख्य संपादक:गिरीष देशमुख 

वसमत शहरातील आसेगाव कॉर्नर येथील युनियन बँक शाखेबाहेर उभी असलेल्या कारची काच फोडुन १० लाख रुपये लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा,हिंगोली यांना यश आले आहे.या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन चोरीतील ५ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.९ जुन २०२६ रोजी प्रशांत विलासराव डाखोरे (रा.पळसगाव, ता.वसमत,जि.हिंगोली) यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.त्यांच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी वसमत येथील युनियन बँक शाखेतुन १० लाख रुपये काढुन कार क्रमांक एमएच-१३.बीएन- ८७५५ मध्ये ठेवले होते. दुपारी २.४६ ते ३.४५ वाजण्याच्या दरम्यान काही कामानिमित्त कारपासुन दुर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडुन रोख रक्कम चोरून नेली.

या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.

तपास पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासात प्रदीप राजु पेटला व मधु जवळा भास्कर (दोघेही रा.तिपा,बिटरगुट्टा, जि.नेल्लोर,आंध्र प्रदेश) यांचा सहभाग निष्पन्न झाला.पोलिसांनी आंध्र प्रदेशात जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व चोरीतील ५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन,अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या मोहिमेत पो.उ.नि. माधव जिव्हारे यांच्यासह भुजंग कोकरे,शिवाजी जालमिरे, किशोर सावंत,विशाल खंडागळे,आजम प्यारेवाले, ज्ञानेश्वर गोरे,साईनाथ कंठे,मुनीर मुन्नीवाले,शंकर हराळ,दत्ता नागरे आणि प्रदीप झुंजरे यांनी सहभाग घेतला.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement