लिंबगाव हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड,चार आरोपी ताब्यात,मुख्य आरोपी वसमत येथील असुन, ६.८१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गिरीष देशमुख | मुख्य संपादक
दिशा न्युज मराठी २४×७ | वसमत
लिंबगाव जि.नांदेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्याचा नांदेड स्थानिक गुन्हे शाखा आणि लिंबगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वी उलगडा केला असुन,चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडुन चोरीस गेलेली बॅग आणि सुमारे ₹ ६ लाख ८१ हजार किमतीचा मुद्देमाल,ज्यामध्ये सुमारे ३ किलो चांदीचे दागिने आहेत,जप्त करण्यात आले आहेत.
नांदेड पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाला दी.०३ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली की,लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालेगाव रोड परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचुन चार संशयितांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये चौकशीदरम्यान आरोपींनी लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ७८/२०२६ मधील जबरी चोरीची कबुली दिली.तपासात उघड झालेल्या माहितीनुसार,फिर्यादीच्या वडिलांशी झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून मुख्य आरोपी याने आपल्या साथीदारांसह कट रचला होता.त्यानुसार दि.२९ जुन रोजी रात्री सुमारे ०८ वाजण्याच्या सुमारास शिवम बार परिसरात फिर्यादीची दिशाभुल करून त्याच्याकडील चांदीच्या दागिन्यांची बॅग हिसकावुन नेण्यात आली होती.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त केला असुन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले,पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविशंकर बामणे,रितेश कुल्थे,पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत स्वामी,अझरुद्दीन शेख,अनिल बिरादार तसेच लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनकर,पोलीस कर्मचारी रितेश टाक,प्रदीप गद्देनवारे आणि बालाजी तेलंग यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.














Add Comment