लिट्ल कींग्ज इंग्लिश स्कुल येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न,७५ रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख
वसमत शहरातील आसेगाव रोडवरील लिट्ल किंग्स इंग्लिश स्कुल येथे रविवार दि.५ जुलै रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रोटरी इंटरनॅशनल क्लब शाखा वसमत च्या वतीने आयोजित हे शिबिर सकाळी १०:३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होते.
या शिबिरामध्ये परिसरातील तब्बल ७५ नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली.अनुभवी व तज्ज्ञ डॉ.एन एन.काळे यांनी रुग्णांची कॉम्प्युटर द्वारे डोळ्याची मोफत तपासणी केली. तसेच गरजु रुग्णांना चष्म्याचा नंबर तपासुन देत मोफत आय ड्रॉप्सचे व औषध वाटपही करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाच्या प्रसंगी रोटरी इंटरनॅशनल क्लबचे अध्यक्ष ॲड.रणधीर तेलगोटे,सचिव श्रीराम संगेवार,संचालक बाळासाहेब जाधव महागांवकर,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले,गुठ्ठे साहेब,शंकर कदम,डॉ.नामदेव दळवी आणि प्रा.पावार यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.














Add Comment