कुरुंदा पोलिसांची धडक कारवाई,अवैध अग्निशस्त्र व खंजीर बाळगणारा युवक अटकेत
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक -गिरीष देशमुख
हिंगोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्री.श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल गुन्हेगारीविरोधात आक्रमक भुमिका घेत असुन,सातत्याने धडक कारवाया करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करत आहे.त्याच अनुषंगाने कुरुंदा पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र व धारदार खंजीर बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करून त्याच्याकडुन २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ८ जुलै रोजी कुरुंदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिवाजी पुरी हे कर्मचारी भगवान वडकिल्ले,प्रकाश भुरके,बालाजी वडगावे व बालाजी साठे यांच्यासह पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली की,वसमत-औंढा मार्गावरील कोर्टा पाटी परिसरातील राज बार अँड रेस्टॉरंट मध्ये एक युवक गावठी रिव्हॉल्वर व धारदार लोखंडी खंजीर घेऊन बसला आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने आपले नाव विक्रम दत्ता सोनटक्के (वय २४, रा.भेंडेगाव,ता.वसमत) असे सांगितले. पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडुन एक गावठी रिव्हॉल्वर व एक धारदार लोखंडी खंजीर असा एकुण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बिनपरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५ व ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंधेकवाड करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.श्रेणिक लोढा,अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.














Add Comment