Crime Editor Choice Hingoli police

हट्टा पोलिसांची धडक कारवाई अरळ शिवारात अवैध वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त

हट्टा पोलिसांची धडक कारवाई अरळ शिवारात अवैध वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक:गिरीष देशमुख.वसमत

वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांनी अरळ शिवारात अवैध वाळु वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई केली.वसमत ते परभणी रोडवरील तुळजापुर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शासनाने बंदी घातलेल्या पुर्णा नदीच्या पात्रातील वाळुची चोरी करून वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह तब्बल ८ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी हट्टा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी स्वतः कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आनंदराव बोरकर हे आपल्या पथकासह पेट्रोलिंगवर असताना ही कारवाई करण्यात आली.सोमवार,दि.०६ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०५ वाजेच्या सुमारास अरळ शिवारात एक संशयास्पद ट्रॅक्टर वाळु भरून जाताना आढळुन आले.पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवुन चौकशी केली असता,त्यात अवैधरित्या उत्खनन केलेली वाळु आढळुन आली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याप्रकरणी पोलीस नाईक ज्योती पवार बक्कल नंबर ८४४ यांनी दुपारी २:४४ वाजता गुन्हा दाखल केला असुन पोलिसांनी आरोपी गोपाळ हरिभाऊ दशरथे (वय ३५) वर्ष,व्यवसाय शेती,राहणार जोड परळी,ता.वसमत, जि.हिंगोली याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि जमीन महसूल संहिता कलम ४८(७), (८) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सध्या आरोपीला कायदेशीर समजपत्रावर (Notice) सोडण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार ८ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर: ६,५०,०००/- रुपये किमतीचा महिंद्रा अर्जुन ५५५ डीआय कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर MH 38 AK 4817

ट्रॉली.१,५०,०००/- रुपये किमतीची ‘राज’ कंपनीची लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली.

वाळू- ५,०००/- रुपये किमतीची एक ब्रास अवैध वाळु

एकूण जप्त मुद्देमाल-८,०५,०००/- रुपये.

पुढील तपास सुरू

सदर अवैध वाळु उपसा जोड परळी शिवारातील पुर्णा नदीच्या पात्रातुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून केला जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस हवालदार आडे बक्कल नंबर ६७० हे करत आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement