Crime Editor Choice Maharashtra

५ हजार रुपयांची लाच मागणारा वसमत पंचायत समितीचा (कंत्राटी) अभियंता ए.सी.बी.च्या जाळ्यात

५ हजार रुपयांची लाच मागणारा वसमत पंचायत समितीचा (कंत्राटी) अभियंता ए.सी.बी.च्या जाळ्यात

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत

वसमत तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले (कंत्राटी) अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांच्याविरुद्ध ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदार यांनी दि.१० जुन २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती.तक्रारदार यांच्या मंजुर गोठ्याच्या बांधकामाची एम.बी.(मोजमाप पुस्तिका) लिहुन पुढील कार्यवाही पुर्ण करून दोन हप्त्यांची रक्कम मिळवुन देण्यासाठी कनिष्ठ अभियंता गणेश गुजर यांनी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या तक्रारीची एसीबीने पडताळणी केली असता दि. १० जुन २०२६ रोजी लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर दि. २२ जुन रोजी सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले.मात्र आरोपी लोकसेवकाला संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही व तेथुन निघुन गेले.

यानंतर तक्रारदाराने दिलेल्या पुढील जबाबाच्या आधारे व पडताळणीतील निष्कर्षानुसार सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली.त्यावरून दि.१० जुलै रोजी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४४४/२०२६ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये आरोपी गणेश बापुसाहेब गुजर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विकास घनवट,पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लु,पोलीस निरीक्षक बालाजी तिपलवाड, रवींद्र वरणे,राजाराम फुफाटे,भगवान मंडलिक,गजानन पवार,गोविंद शिंदे,अकबर शेख,मपोह योगिता अवचार,पुंडगे,अमोल जाधव तसेच एसीबीच्या पथकाने केली.

यावेळी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की,कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास त्वरित एसीबी,हिंगोली कार्यालयाशी संपर्क साधुन तक्रार नोंदवावी.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement