कागबन येथे गौतम बुद्ध मुर्तीची स्थापना,आमदार राजुभैय्या नवघरे यांची प्रमुख उपस्थिती
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख
वसमत तालुक्यातील कागबन येथे दिवंगत मधुकर नामदेव कोल्हे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि.२३ जुलै रोजी आनंद बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते हा धार्मिक व प्रेरणादायी सोहळा संपन्न झाला.
मधुकर कोल्हे यांचे दि.१३ जुलै रोजी निधन झाले होते.त्यांच्या उत्तरकार्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी त्यांचे सुपुत्र साईनाथ कोल्हे व अभिजित कोल्हे यांनी कागबन येथील आनंद बौद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची स्थापना करून समाजासाठी आदर्शवत उपक्रम राबविला.
यावेळी आमदार राजुभैय्या नवघरे यांनी कोल्हे कुटुंबाच्या या समाजोपयोगी व प्रेरणादायी कार्याचे कौतुक करत,अशा उपक्रमांमुळे समाजात शांतता,समता आणि बंधुभावाचा संदेश अधिक दृढ होतो,असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी संदीप घोडजकर,विकी वाघमारे,राज भालेराव,नरेंद्र करवंदे,प्रा.संतोष हंकारे,लक्ष्मण गायकवाड,सरपंच हनुमान ढवळे,सुर्य भान फेगडे यांच्यासह ग्रामस्थ,बौद्ध अनुयायी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला.














Add Comment