वसमत शहर पोलीसांकडुन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
व्यसनमुक्ती,सायबर सुरक्षा,महिला सशक्तीकरण,अपघात प्रतिबंध व डायल ११२ विषयी मार्गदर्शन.
वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सोमवार,दि.३ ऑगस्ट रोजी शहरातील अहिल्यादेवी होळकर विद्यालय,सिद्धेश्वर विद्यालय व हुतात्मा बहिर्जी विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे,सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे तसेच सुरक्षित जीवनशैलीचा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती,सायबर सुरक्षा,महिला सशक्तीकरण,रस्ते अपघात प्रतिबंध व वाहतुक नियमांचे पालन,तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळविण्यासाठी डायल ११२ या सेवेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.सोशल मीडियाचा सुरक्षित वापर,ऑनलाइन फसवणुकीपासुन बचाव,अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे,महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध कायदेशीर तरतुदी आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, सहायक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले,सहायक पोलीस निरीक्षक ढोरे मॅडम,पोलीस उपनिरीक्षक राखोंडे मॅडम,महिला पोलीस कर्मचारी चव्हाण मॅडम,सानप मॅडम,मगर मॅडम,तसेच वळसे,अवचार,गुहाडे,शेख शमी,गजानन भोपे,राठोड,साहिल नय्यर यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला संबंधित शाळांतील मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन करणारे,जबाबदार आणि सजग नागरिक बनण्याचे आवाहन केले.
या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढण्यास,व्यसनांपासुन दुर राहण्याची प्रेरणा मिळण्यास तसेच महिला सुरक्षा,वाहतुक नियम आणि आपत्कालीन सेवांचा योग्य वापर करण्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे उपस्थितांनी सांगितले.














Add Comment