स्वरोहम् संगीत विद्यालय,वसमतचा गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी गायनातुन अर्पण केली गुरुदक्षिणा
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक गिरीष देशमुख,वसमत
स्वरोहम् संगीत विद्यालय,वसमत यांच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव श्री बोधानंद मठ,वसमत येथे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमात संगीत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल गायनातुन गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत अनोखी गायनरूपी गुरुदक्षिणा अर्पण केली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भक्तीगीत,अभंग,गवळण,भावगीत तसेच नाट्यगीतांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासपुर्ण आणि दर्जेदार सादरीकरण करत आपल्या संगीत साधनेची झलक दाखवुन कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.शरद महाराज अंबेकर हे होते.प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.पंजाब आंभोरे,ॲड.राजेंद्र पोतदार आणि चंद्रकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गायनाचे भरभरून कौतुक करत वसमत शहराला लाभलेल्या समृद्ध संगीत परंपरेचा गौरव केला.संगीताची ही परंपरा अशाच प्रकारे जोपासली गेली पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
संगीत विद्यालयाचे संचालक श्री लक्ष्मीकांत धानोरकर आणि श्री दीपक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सातत्यपुर्ण रियास,शिस्त आणि गुरूंचे मार्गदर्शन यामुळेच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले असल्याचे सांगितले.
यावेळी श्री लक्ष्मीकांत जोशी धानोरकर यांच्या पालकांच्या वतीने श्री विठ्ठल घिके,श्री महेश इनामदार,श्री आदित्य देशपांडे आणि श्री सुनील कबाडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेख पद्धतीने पार पडले.कार्यक्रमाच्या समारोपास श्री सुनील कबाडेसर यांनी उपस्थित मान्यवर,पालक,रसिक श्रोते आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.श्री आनंद बडवणे यांचेही या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या संगीत सोहळ्याने गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत वसमतच्या सांस्कृतिक आणि संगीत परंपरेला नवसंजीवनी दिली.














Add Comment