Crime Editor Choice Vasmat city

वसमत शहर पोलिसांत अल्पवयीन मुलीचा पाठलाग व छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल,संशयिताविरुद्ध पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई

वसमत शहर पोलिसांत अल्पवयीन मुलीचा पाठलाग व छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल,संशयिताविरुद्ध पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये कारवाई

दिशा न्युज मराठी २४×७.

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

वसमत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडत छेडछाड करणे, तसेच तिचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS),पोक्सो (POCSO) कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून व दाखल प्रथम माहिती अहवालानुसार (एफआयआर),पिडीत मुलगी आपल्या कुटुंबासह वसमत येथील हाऊसिंग सोसायटी परिसरात वास्तव्यास असुन ती अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे.

दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर पिडीत मुलगी पायी घरी जात असताना पिडीत मुलीच्या घराच्या परिसरातील मंदिराजवळ संशयित आरोपी रा.सोमवार पेठ,वसमत जि.हिंगोली याने तिचा रस्ता अडवुन हात पकडत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने,”माझ्याशी बोलली नाहीस तर तुझे फोटो एडिट करून इंटरनेटवर व्हायरल करेन,”अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद आहे.

यापुढे आरोपीने पीडितेच्या आईच्या मोबाईलवर फोन करून,”तुझ्या मुलीला माझ्याशी बोलु दे,अन्यथा तिचे फोटो व्हायरल करेन आणि तुम्हा सर्वांना जिवे मारीन,”अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.तसेच आरोपी मागील पाच ते सहा महिन्यांपासुन पीडित मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या सततच्या छेडछाडीला व धमक्यांना कंटाळुन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात दि.३१ जुलै २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमे,लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,१९८९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे करीत असुन,त्यांना वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांचे सहकार्य करत आहेत.

Featured

Advertisement

Advertisement