हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
दिशा न्युज मराठी २४×७,वसमत
मुख्य संपादक -गिरीष देशमुख
कायदेशीर कारवाईची मागणी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व प्रसारमाध्यमांद्वारे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याबाबत केल्याचा आरोप असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गंभीर दखल घेतली आहे.या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वसमतच्या वतीने गुरुवारी दि.६ ऑगस्ट उपविभागीय अधिकारी (एसडीएम) यांना निवेदन देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमत शहराध्यक्ष आनंद रमेश बडवणे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात, हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबाबत “गुंगी गुडिया” असा कथित अवमानकारक शब्दप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,लोकशाही व्यवस्थेत राजकीय मतभेद,टीका-टिप्पणी आणि विचारभिन्नता असणे स्वाभाविक आहे. मात्र,एका महिला लोकप्रतिनिधी बाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारे नसुन,त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवेदनाद्वारे प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत
हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याची तातडीने चौकशी करण्यात यावी.
चौकशीत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी.
भविष्यात कोणत्याही महिला लोकप्रतिनिधी बाबत अशा प्रकारची अवमानकारक भाषा वापरली जाणार नाही,यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
या निवेदनावर शहराध्यक्ष आनंद रमेश बडवणे यांच्यासह लक्ष्मीकांत नवघरे,अजगर पटेल,सचिन दगडु,राजकुमार एंगडे,विनोद चव्हाण,लखण भडगळ,धनंजय गोरे, मुबीनदा,गौतम वाहुळे,सुरज फेगडे,दीपक कट्टेकर,भिमराव सरकटे,दत्ता कट्टेकर,पारखे सर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी,नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.














Add Comment